आयनिक वृत्तावर असलेल्या तारकासमूहातून म्हणजेच राशींमधून होणाऱ्या सूर्य,चंद्र यांच्या प्रवासाचा उपयोग कालगणनानेसाठी खूप आदिम काळापासून होतो आहे . एका वर्षात म्हणजे १२ महिन्यात सूर्य १२ राशीमधून भ्रमण करतो. म्हणजे एका राशीत तो एक महिना मुक्कामाला असतो.
पूर्वी बऱ्याच संस्कृतीतले सणवार ,उत्सव हे या सूर्याच्या राशी प्रवेशावर आधारित होते.

१४ जानेवारीला सूर्य कुंभ राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. दरवर्षी हा सण १४ (काहीवेळा १५ )
जानेवारीलाच येतो.या वरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो कि दर महिन्याच्या १४ (किंवा कधी १५) तारखेला सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो .भारतीय संस्कृतीत हा प्रवेश संक्रांत या नावाने ओळखला जातो . हा पर्व काळ मानून दानधर्म इत्यादी सांगितले आहे . मेष संक्रांत , सिंह संक्रांत , कर्क संक्रांत अश्या वर्ष भरातल्या १२ पैकी ११ संक्रांतीचा महत्व कमी होत सध्या पण फक्त मकर संक्रांतच साजरी करतो.
सूर्याचे राशी प्रवेश पुढील प्रमाणे आहेत .
सूर्याचा हा राशिप्रवेश फक्त धार्मिक दृष्ट्या नाही तर खगोलीय दृष्ट्या सुद्धा महत्वाचा आहे . आकाश निरीक्षण करताना आपल्याला सूर्य कुठल्या राशीत आहे हे लक्षात ठेवावे लागते .
आपण मेष राशी पासून सुरवात करू-
१४ एप्रिल ला सूर्य मेष राशीत प्रवेश करतो .म्हणजे १४ एप्रिल पासून हळू हळू मेष रास सूर्याच्या पार्श्वभूमीवर येईल . यायचं अर्थ ती सूर्य सोबत उगवेल आणि संध्याकाळी सूर्य सोबत मावळेल आणि म्हणजेच या काळात आपण मेष रास बघू शकणार नाही !
म्हणजे समजा आपल्याला मेष आणि त्याच्या आसपास च्या तारकासमूहांचं निरीक्षण करायचे असेल तर ते एप्रिल च्या आधीच करावं लागेल.
पण मग एप्रिल महिन्यात कुठली रास दिसेल ?
किंवा मेष रास आपल्याला रात्रभर परत कधी बघता येईल?याच उत्तर शोधण्या साठी या[ आपण पुन्हा १४ एप्रिल वर येऊ.
या दिवसापासून संध्याकाळी सूर्यास्ताला मेष रास सूर्यासोबत पश्चिमेला मावळत असेल आणि त्याचवेळी पूर्व क्षितिजावर मेषेपासून ६ वि असणारी कन्या रास उगवत असेल.म्हणजे कन्या रास बघण्याचा सर्वोत्तम कालावधी हा एप्रिल नंतर असेल !
कुठली रास मावळत असताना कुठली रास उगवत असेल याच एक ढोबळ कोष्टक पुढील प्रमाणे :
या कोष्टकात आपण पाहू शकतो कि १५ नोव्हेंबर नंतर संध्याकाळी सूर्य वृश्चिकेत मावळात असताना पूर्वेला मेष रास उगवत असेल म्हणजे साधारण नोव्हेंबर पासून आपण संध्याकाळ पासून मेष राशीचे निरीक्षण सुरु करू शकू.
पृथ्वी २४ तासात स्वतःभोवती फिरते .२४/१२ =२ म्हणजे प्रत्येक राशीच्या वाट्याला येतात २ तास म्हणजे पूर्व क्षितिजावर दर २ तासांनी एक नवीन रास उगवते.
आपण पुन्हा १४ एप्रिलच्या संध्याकाळी येऊ .समजा संध्याकाळी ७ वाजता पश्चिमेला मेष मावळात असताना पूर्वेला कन्या उगवत असेल .२ तासांनी म्हणजे ९ वाजता कन्या साधारण ३० अंशातून वर आलेली असताना पूर्वेला तूळ रस उगवत असेल . साधारणपणे ११ वाजता वृश्चिक, १ वाजता धनु , ३ वाजता मकर उगवतील . आणि सूर्योदयाला मीन आणि मेषेचा सीमेवर सूर्य उगवेल.
१५ मे ला ७ वाजता पूर्वेला तुला उगवाच्या २ तास आधीच कन्या उगवलेली असेल त्याच्या २ तास आधी सिंह उगवलेली असणार .म्हणजे मे महिन्यात संध्याकाळी सिंह साधारण डोक्यावर आलेली असणार
एप्रिल मध्यानंतर ७ ला मेष मावल्या नंतर २ तासात वृषभ मावळेल .म्हणजे आपल्याला कृत्तिका तारकापुंज ,रोहिणी तारा , रोहिणीगुच्छ वैगरे ऑब्जेक्टस बघायचे असतील तर या २ तासत पटकन पाहून घ्यावे लागतील .
एखादा ग्रह सध्या कुठल्या राशीत आहे हे आपल्याला माहित असेल तर ती रस केव्हा-उगवेल मावळेल या वरून आपण त्या ग्रहाचे निरीक्षणाची वेळ ठरवू शकतो.
या राशींच्या सोबत त्यांच्या आजूबाजूचे तारकासमूह पण उगवतील -मावळातील .
१५ एप्रिल नंतर साधारण ९ ला वृषभ मावळात असताना पश्चिम क्षितिजावर मृग, बृहदलुब्धक, मिथुन,सारथी हे तारकासमूह असतील.पूर्वेला कन्या उगवत असताना भूतप, उत्तर मुकुट वैगरे तारकासमूह असतील. डोक्यावर कर्क,सिंह ,वासुकी,लघुलुब्धक असतील.
म्हणजे आपल्याला सूर्याचा राशिप्रवेश , राशींचा क्रम आणि प्रत्येक राशीच्या शेजारील तारकासमूहांची माहिती असेल तर आपण कुठल्या वेळी काय दिसेल असा अख्या आकाशाचा अंदाज लावू शकतो .
____________________________________________________________________
टीप: वरील माहिती हि ढोबळमानाने वापरता येईल. आपल्याला खालील बाबी लक्षात ठेवणे गरजेचे आहे -
१)३० हे राशीचे क्षेत्र झाले ,प्रत्यक्षात तो तारकासमूह त्या पेक्षा मोठा किंवा लहान असू शकतो
सगळ्या राशींचा आकार सारखा नाही .कन्या,धनु या आकाराने मोठ्या आहेत तर मेष ,कर्क या आकाराने लहान आहेत .त्यामुळे त्यांच्या उगवण्या-मावळ्यांची वेळ २ तासापेक्षा कमी जास्त असू शकते
२) दर महिन्याच्या १४/१५ तारखेला सूर्याचा राशिप्रवेश होतो याचा अर्थ सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत टुणकन उडी मारत नाही. दररोज १ अंश असा सरकत सरकत सूर्याचे भ्रमण चालते
३) सगळ्या राशी पूर्णपणे आयनिकवृत्तावर नाही काही त्याच्या वर आहेत तर काही खाली
थोडक्यात आपल्याला आकाशनिरीक्षण करण्यासाठी या माहितीसोबत थोडं तारतम्य सुद्धा बाळगावं लागेल !