दरवर्षी जगभर ४ ते १० ऑक्टोंबरच्या दरम्यान जागतिक अंतराळ सप्ताह (World Space Week)साजरा केला जातो.हा जागतिक स्तरावर साजरा होणारा सगळ्यात मोठा खगोलीय कार्येक्रम आहे असं म्हटल्यास वावग ठरू नये.जगभरातल्या अनेक देशातील अवकाश संशोधन संस्था,खगोलीय संस्था,हौशी मंडळे,शाळा ,महाविद्यालये हा उपक्रम राबवतात.जागतिक अंतराळ सप्ताह संस्थेकडून दरवर्षी एक विषय ठरवला जातो.या विषयाला अनुसरून वेगवेगळे उपक्रम,स्पर्धा,व्याख्याने ,प्रदर्शन असे विविध कार्येक्रम अगदी जगभर होतात.
इतिहास -
मानवाच्या पहिल्या चांद्रसफरीच्या यशानिमित्त अंतराळ सप्ताह साजरा करण्यासाठी १९८०साली "जागतिक अंतराळ सप्ताह संस्था " [World Space Week Association (WSWA) ] स्थापन झाली.जुलै १९८० मध्ये पहिला असा सप्ताह अमेरिकेतल्या टेक्सास राज्यातील ह्युस्टन येथे साजरा झाला.१९९९ पर्यंत १५ देशात या कल्पनेचा प्रसार झाला.
६ डिसेंबर १९९९ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत असा एक सप्ताह जागतिक स्तरावर साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडण्यात आला.त्यानुसार ४ ते १०ऑक्टोंबर हा आठवडा अंतराळ सप्ताह साजरा करावा असे ठरवण्यात आले.या २ तारखांचे देखील विशेष महत्व आहे.
४ ऑक्टोंबर १९५७साली तत्कालीन सोव्हियत रशियाने पहिला मानव निर्मित उपग्रह स्पुटनिक-१ अवकाशात पाठवला होता.तर १० ऑक्टोंबर १९६७ साली जगभरातल्या सर्व देशांनी अवकाशाचा उपयोग हा युद्धासाठी नाही तर नेहमी शांतता आणि संशोधनासाठी केला जावा या संकेताला मान्यता दिली होती.२००० साला पासून हा सप्ताह जगभर साजरा केला जातो आहे.२०१६ साली ८६ देशांमध्ये सुमारे २७०० वेगवेगळे कार्येक्रम या निमित्ताने आयोजित केले गेले होते.
४ ऑक्टोंबर १९५७साली तत्कालीन सोव्हियत रशियाने पहिला मानव निर्मित उपग्रह स्पुटनिक-१ अवकाशात पाठवला होता.तर १० ऑक्टोंबर १९६७ साली जगभरातल्या सर्व देशांनी अवकाशाचा उपयोग हा युद्धासाठी नाही तर नेहमी शांतता आणि संशोधनासाठी केला जावा या संकेताला मान्यता दिली होती.२००० साला पासून हा सप्ताह जगभर साजरा केला जातो आहे.२०१६ साली ८६ देशांमध्ये सुमारे २७०० वेगवेगळे कार्येक्रम या निमित्ताने आयोजित केले गेले होते.
सप्ताहाची "थीम"-
या थीम ला अनुसरून जगभर विविध कार्येक्रमांचे आयोजन होते.
२००० साली पहिल्यांदा जागतिक स्तरावर साजर्या झालेल्या या सप्ताहाचा विषय होता-अंतराळ सहस्रकाचा आरंभ ("Launching the Space Millennium).२००२ या वर्षीसाठी विषय होता अंतराळ आणि आपले दैनंदिन जीवन.१९५७ साली मानवाने पहिला उपग्रह अवकाशात पाठवल्याच्या घटनेला २००७ साली ५० वर्ष पूर्ण झाली त्या निमित्ताने त्यावर्षीचा विषय होता -अंतराळातील 50 वर्षे .
२०१५ चा सप्ताह आत्ता पर्यंत लागलेल्या विविध खगोलीय शोधांना समर्पित होता.२०१६ चा विषय होता भविष्याला सक्षम बनवणारे दूरस्थ संवेदन(Remote Sensing – Enabling our Future)
२००० साला पासून चे वेगवेगळे विषय पुढील प्रमाणे -
२०००-Launching the Space Millennium
२००१- Inspiration from Space
२००२- Space and Daily Life
२००३-Space: Horizon Beyond Earth
२००४-Space for Sustainable Development
२००५- Discovery and Imagination
२००६- Space for Saving Lives
२००७- 50 Years in Space
२००८ -Exploring the Universe
२००९-Space for Education
२०१०-Mysteries of the Cosmos
२०११-50 Years of Human Spaceflight
२०१२-Space for Human Safety and Security
२०१३-Exploring Mars – Discovering Earth
२०१४-Space: Guiding Your Way
२०१५-Discovery
२०१६-Remote Sensing – Enabling our Future
या वर्षी २०१७ सालची थीम आहे -अवकाशात नव्या जगाचा शोध (Exploring New Worlds in Space)
यात प्रामुख्याने अंतराळात सजीव सृष्टीचा शोध घेण्याचे प्रयत्न ,न्यू होरायझन्स सारखे अॅस्ट्रोबायोलॉकल मोहिमा यांच्यावर वर भर असेल . तसेच पाणी ,धातू ,उर्जा यांसारख्या पृथ्वीवर संपत चाललेल्या पदार्थाना अंतराळातून पृथ्वीवर आणता येऊ शकेल का ? त्या दृष्टीने कोणत्या मोहिमा सध्या आखल्या गेल्या आहेत याविषयी देखील चर्चा होईल.
भारतात इस्रो , विक्रम साराभाई अंतराळ केंद्र,इस्रो इनर्शियल सिस्टम युनिट यासारख्या अवकाश आणि तंत्रज्ञानाशी सबंधित इतर सरकारी संस्था,विद्यापीठे,हौशी खगोल प्रेमी संस्था ,तारांगणे विविध कार्येक्रमांचे आयोजन केले जाते.नाशिक महानगरपालिका देखील इतर खगोलप्रेमी संस्थांच्या सहकार्याने जागतिक अंतराळ सप्ताहात विविध उपक्रम राबवते .हा सप्ताह साजरी करणारी नाशिक मनपा ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे.
सर्व खगोल प्रेमीना जागतिक अंतराळ सप्ताहाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!