Nov 16, 2017

सिंहस्थ उल्कावर्षाव

दिवाळी नंतरची दिवाळी - सिंहस्थ उल्कावर्षाव



पृथ्वीवरची आपली  दिवाळी  संपली असली तरी आकाशातली एक दिवाळी अजून बाकी आहे.ती म्हणजे सिंहस्थ उल्कावर्षाव.दरवर्षी १४ ते २२ नोव्हेंबर दरम्यान उल्कांची आतषबाजी दिसते.  त्याचे केंद्र  सिंह तारकासमूहात असल्या सारखे ‘दिसत' असल्याने याला सिंहस्थ किंवा लिओनिड्स  असे म्हणतात.


उल्का  म्हणजे काय?
अंधाऱ्या रात्री  आकाशात सर्रऽऽर्कन्‌ एखादी प्रकाश रेषा चमकून जाताना आपल्याला दिसते.त्याला आपण तारा तुटला असं म्हणतो. प्रत्यक्षात  तारे कधीही तुटत नाही. आपल्याला पडताना दिसणारी चमकती गोष्ट असते उल्का.

अवकाशात धूमकेतू किंवा लहान-मोठे लघुग्रह   यांच्या मार्गात अनेक धूळ आणि दगड आणि अनेक छोट्या अ-ग्रहीय वस्त असतात त्यांना उल्काभ (मिटिअरॉइड) असे म्हणतात. 

असे उल्काभ जेव्हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीकडे  खेचले जातात,तेव्हा वातावरणाशी घर्षण होऊन ते जळतात आणि आपल्याला त्याची प्रकाश शलाका दिसते.याला आपण उल्का(मिटिअर) असे म्हणतो.
बरेचसे उल्काभ वातावरणात पूर्णपणे जळून जातात,पण काही मोठे उल्काभ पृथ्वीवर येऊन आदळतात त्यांना अशनी (मिटिअराइट)  म्हटले जाते.



उल्कावर्षाव म्हणजे काय?
पृथ्वीवर रोजच  सुमारे काही हजार टन एवढ्या वस्तुमानाचे दगड येत असतात.पण आकाराने फारच लहान आपल्याला ते जाणवत नाही. पण वर्षातले काही दिवस असे असतात जेव्हा एखाद्या ठराविक दिशेतून हमखास उल्का पडतांना दिसतात.जेव्हा एका रात्रीत ताशी  साधारण वीसपेक्षा जास्त उल्का पडताना दिसतात, तेव्हा त्याला ‘उल्कावर्षाव’ असं म्हटल जात


उल्कावार्षावाचे कारण -
बहुतांश उल्कावर्षावाचे प्रमुख कारण आहेत धूमकेतू.आपल्या सूर्यमालेत अनेक धुमकेतू सूर्याभोवती मोठी प्रदक्षिणा घालत फिरत आहेत..
धूमकेतू पुढं निघून गेला, तरी त्याच्या शेपटीतली धूळ त्याच्या मार्गात साठून राहते आणि अश्या धुळीचा सूर्याभोवती बांगडी सारखा पट्टाच तयार होतो.वर्षातल्या काही ठराविक दिवसात आपली पृथ्वी  या पट्ट्याजवळून जात असते, तेव्हा त्यातली ही धूळ पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळं पृथ्वीकडे खेचली जाते. आणि आपल्याला उल्कावर्षाव दिसतो.


उल्कावार्षावाचे केंद्र आणि नाव
रात्रीच्या आकाशात उल्का पडताना प्रत्येक उल्केची एक प्रकाशाची रेघ तयार झालेली आपल्याला दिसते . अशी प्रत्येक प्रकाश शलाका आकाशात मागे  वाढवली, तर त्या साऱ्या रेषा जणू एका बिंदूतून निघाल्यासारख्या दिसतात. त्याला आपण उलाक्वर्षावाचे केंद्र  म्हणू शकतो.असे केंद्र ज्या तारकासमूहात असल्याचे आपल्याला दिसते त्या  तारकासमूहाच्या नावाने   तो उल्का वर्षाव ओळखला जातो.
उदाहरणार्थ मिथुन म्हणजे  ‘जेमिनी’ तारकासमुहातून होणारा उल्कावर्षाव  ‘जेमिनिड्‌स’ म्हणून ओळखला जातो   मृग -ओरायनमधील ‘ओरिओनिड्‌स’,ययाती -पर्सियस मधील पर्सिड्स (Perseids) अशी हि  नावं आहेत.

सर्वोच्च वर्षावाचा दिवस
प्रत्येक उल्कावर्षावाच्या  कालावधातीत रोज थोड्या फार उल्का पडताना दिसतात पण एका विशिष्ट दिवशी सर्वाधिक उल्का वर्षाव होताना दिसतो.
२३ जुलै ते २२ ऑगस्ट  या दरम्यान होणार्या पर्सिड्स  उल्कावर्षावात १२ऑगस्ट ला सर्वाधिक म्हणजे सरासरी ताशी  ८०  पडताना दिसतात.

१४ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत होणारा उल्कावर्षाव  सिंह तारका समूहातून होताना दिसतो म्हणून त्याला सिंहस्थ उल्कावर्षाव किंवा  लिओनिड्स(Leonids meteor shower) म्हटले जाते . हा उल्कावर्षाव  टेम्पल-टटल या धूमकेतूमुळे होतो.याच्या  सर्वोच्च वर्षावाची रात्र १७ -१८ नोव्हेंबर असते.

सिंहस्थ उल्कावर्षाव केव्हा आणि कुठे पहावा ?
शुक्रवारी १७ तारखेच्या  रात्री  सर्वाधिक उल्का बघता येतील. १८ तारखेला शनिवारी रात्री सुद्धा हा उल्का वर्षाव बघता येईल. अमावस्या असल्याने चंद्र प्रकाशाचा त्रास होणार नाही.
उल्का वर्षाव पाहण्यासाठी शहरापासून लांब अंधारी जागा,मैदान किंवा उंच अंधारी टेकडी असेल तर  फारच
उत्तम.हे शक्य नसल्यास आपल्या घराच्या गच्चीवरुन किंवा किंवा  मैदानावरून उल्कापात बघता येऊ शकतो,प्रकाशाच्या प्रदुषणामुळे कमी प्रमाणात उल्का दिसतील. पण अगदीच काही ण बघण्यापेक्षा हे बरं.
उल्का वर्षावाचा केंद्र असणारी सिंह रास साधारण मध्यरात्री नंतर उगवेल.उत्तर रात्री ३:०० वाजे पर्यंत ती डोक्यावर आली असेल. हि  उल्कावर्षाव बघण्याची  सर्वोत्तम वेळ. त्याच्या आधी सुद्धा तुरळक उल्का दिसतील. जमिनीवर सतरंजी किंवा अंथरुण घालून त्यावर झोपून आकाशाचं संपूर्ण दृश्य पाहता आलं तर त्यासारखं दुसरं सुख नाही.आरामखुर्ची हा सगळ्यात उत्तम पर्याय त्यामुळे फक्त डोक्‍यावरच आकाश नाही तर  क्षितिजालगतचं आकाश पण दिसू शकत.रात्रीच्या कडकयच्या थंडी साठी गरम कपडे आवश्यक आहेत.खूप वेळ निरीक्षण करणार असाल तर  अधून मधून वाफाळता चहा पण हवा.


सिंह रास कशी ओळखावी?
सिंह रास ओळखण्याची सगळ्यात सोप्पी खुण म्हणजे त्यातल्या मघा नक्षत्राचा उलट्या प्रश्न चिन्हा सारखा आकार. ६ ताऱ्यांचे  मिळून विळ्यासारखा एक आकार तयार होतो. त्याच्या मागए एक ३ तार्यांचा  काटकोन त्रिकोण दिसतो. हे सर्व जोडले कि सिंह तारकासमूह तयार होतो.

 

उत्तरेला पतंगी सारख्या आकाराचा सप्तर्षी हा सगळ्यांना ओळखता येणारा तारकासमूह.  सप्तर्षी मधले पहिले दोन तार्यान मधून एक काल्पनिक रेषा काढली कि ती  उत्तरेकडे ध्रुव तार्याकडे  जाते .तीच काल्पनिक रेषा मागे वाढवली कि सिंह तारकासमूह दर्शवते.

 

उल्कावर्षाव हा सध्या डोळ्यांनीच बघायचा असतो त्याच्या साठी दुर्बिणीची गरज नाही.मागच्या वर्षी चंद्र प्रकाशामुळे सिंहस्थ उल्कावर्षाव विशेष दिसला नव्हता. या वर्षी अमावस्या असल्याने हि अडचण होणार नाही. १७ ताखेच्या रात्री  मित्रांसोबत एखाद्या अंधार्या जागी जाऊन रात्रभर हा उल्कावर्षाव  बघू शकतात. १७ ला जमले नाही तर १८ च्या रात्री सुद्धा हा उल्कापात बघून दुसर्या दिवशी रविवारी झोपेची भरपाई करू शकतात.अगदीच नाही जमल तर १७ च्या रात्री २:३० चा गजर लाऊन जमेल तितका वेळ  आपल्या घराच्या गच्ची वरून लिओनिड्स बघू शकतात.एका तासात किती उल्का दिसल्या याची तुम्ही नोंद ठेऊ शकतात.
 

थोडक्यात आपल्याला जमेल तिथून ,जमेल तितक्या  वेळ ,जमेल तसं   सिंहस्थ उल्कावर्षावाचा आनंद घ्या.आकाशातली हि नैसर्गिक आतिषबाजी बघायची संधी सोडू नका!!!!!

Nov 15, 2017

गोष्ट एका फेटनची



 गोष्ट एका फेटनची

खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे हि.संध्याकाळ झाली ,स्वर्गात अपोलो आपल्या रोजच्या कामावरून परत आले . अपोलो म्हणजे साक्षात सूर्य देवता. रोज ते आपल्या सोनेरी रथात बसायचे आणि पूर्वे पासून पश्चिमेपर्यंत दिवस भर प्रवास करायचे . यातूनच पृथ्वीवर प्रकाश,उर्जा मिळायची.  त्यांचा उमद्या घोड्यांच्या ,सोन्याचा, तेजस्वी रथ सगळ्या विश्वात चर्चेचा विषय होता.खरच आहे म्हणा .असा भारी रथ तर देवांच्या राजा झीउस कडे सुद्धा नव्हता.

म्हणूनच कि काय सगळ्या देवपुत्रांमध्ये “फेटन” ला फार भाव असयाचा. फेट्न सूर्य देवांचा मुलगा .
अति लाडामुळे थोडा हट्टी .

त्याचे सगळे मित्र म्हणायचे “तुझ्या बाबांसारखा रथ कोणा कोणा कडे नाही”हे ऐकून फेटन जाम खुश व्हायचा.”हो मग ,आणि तुम्ही बघाच मी सुद्धा तो रथ चालवणार आहे “आपल्या बाबांचा रथ एकदा तरी चालवावा असं त्याला फार वाटे. म्हणून तर रोज तो  हट्ट करी.

आज पण अपोलो घरी येताच आणि फेटन ने रोजच्या सारखा हट्ट केला “बाबा तुमचा रथ मला एकदा चालवू द्या ना “. “नाही बाळा ,हि काही गंमत नाही . याचे शक्तिशाली  घोडे फक्त मीच नियंत्रित करू शकतो.ठरलेल्या वेळेत ,ठरलेल्या मार्गा वरून हा  रथ  चालला नाही तर विश्वात हाहाःकार उडेल. तू  अजून लहान आहेस” नेहमी प्रमाणे अपोलो देवानी फेटन ला समजावले.

“काय फेटन ? आज पण बाबा ओरडले वाटत “ सिग्नस ने विचारले .सिग्नस  हा फेटन चा एकदम जिगरी दोस्त.”बाबा किती हि ओरडू देत .मी त्यांचा रथ चालवणारच. उद्याच बाबा उठायच्या आत मी त्यांचा   रथ घेऊन जातो  कि नाही बघ तू “ फेट्न पण आज हट्टाला पेटला होता .
दुसर्या दिवशी  अपोलो देव उठायच्या आत फेटन गुपचूप उठला . त्याने रथाला घोड्यांना जोडले. लगाम हातात घेतला.” अरे फेट्न हे काय करतोय तुझे बाबा म्हणतात ना हे खूप धोक्याचं आहे .ऐक कि त्याचं   “ सिग्नस  ने समजावून पहिले. पण फेट्न ने आज काही ऐकायचे नाही असंच  ठरवल होत “ मी कुणाचं ऐकत नाही ,मी कुणाला घाबरत नाही “ असं म्हणत त्याने लगाम झटकला .घोडे धावू लागले.
नेहमीच्या सवयी प्रमाणे घोडे रथाला आयनिक वृत्तावर घेऊन आले. सूर्याच्या आकाशातला रोजच्या जाण्याचा मार्ग होता तो. याच मार्गावरच्या १२ तारकासमूहातून अपोलो भ्रमण करायचे. यामुळे पृथ्वीवर दिवस -रात्र ,महिने ,ऋतू ,वर्ष वैगरे मिळायचे.
फेट्न आज फार  आनंदात होता. हट्टाने त्याने त्याची इच्छा पूर्ण केली होती. रथ आता मेष तारका समूहातून जाऊ लागला. “हे काय  अपोलो देव इतक्या जोरात का रथ चालवताय बुवा ??” मेष ने शेजारच्या वृषभ ला विचारले. वृषभेचा धिप्पाड बैल सुद्धा आश्चर्याने बघत होता. फेट्न ला ते पाहून भारी मजा येत होती.


आता तो मिथुन तारका समूहाच्या जवळ आला. “अरेच्च्या तुम्ही दोघ पोलक्स आणि कॅसतर आहात ना?”तुमची गोष्ट आई मला नेहमी सांगते “ फेट्न म्हणाला . मिथुन राशीतल्या त्या जुळ्या शूर वीर भावांनी फेट्न कडे पहिले . त्यांच्या अनेक पराक्रमांनी  प्रसन्न होऊन झिउस ने त्यांना आकाशात स्थान दिले होते.” अरे तू तर अपोलो देवांचा लहान मुलगा ना ? तू काय करतो आहेस रथात ?? बाळा हे खूप धोकेदायक आहे मागे फिर"“ह्या !  “ मी कुणाचं ऐकत नाही ,मी कुणाला घाबरत नाही “ असं म्हणत फेट्न ने जोरात रथ हाकला.


आता हातात तलवार घेतलेला एक शिकारी त्याच्या पुढ्यात आला .त्याचे २ शिकारी कुत्रे सुद्धा सोबत होते.” अरे वा तुम्हीच ते  विख्यात शिकारी ओरायन  वाटत. तुम्ही खूप हिंस्त्र प्राण्यांची शिकार केली म्हणून झिउस ने तुम्हाला इथे स्थान दिले ना “ फेट्न ओरायन ला म्हणाला. “ हो मुला , पण आकाशात सुद्धा अनेक धोकेदायक प्राणी आहेत ,सिंह ,साप ,अस्वल ,आणि ज्याने मला मारलं तो भला थोरला विंचू सुद्धा ! बाळा तू परत जा “ ओरायन ने सुद्धा समजावून सांगितल.
पण फेट्न हट्टाला पेटला होता “ “ मी कुणाचं ऐकत नाही ,मी कुणाला घाबरत नाही “



आता वाटेत एक मोठा खेकडा लागला , बाजूलाच आकाशातला सगळ्यात मोठा तारका समूह बनून हायड्रा हा साप पसरला होता.त्याच्या जवळचा कोर्व स  कावळा भुरकन उडाला आता  एक भला मोठा सिंह आरामात बसला होता. प्रख्यात वीर हर्क्युलसनेच त्याला आकाशात फेकले होते.रथ पाहून तो घाबरून पळाला. फेट्न ला जाम मजा येत होती . कन्या तारकासमूहातील न्याय आणि बुद्धीची देवता ,भूतप तारकासमूहाचा मेंढपाळ या सगळ्यांनी फेट्न ला समजावून पाहिलं पण त्याचा हट्ट कायम होता  “ मी कुणाचं ऐकत नाही ,मी कुणाला घाबरत नाही “.

फेट्नने रथ अजून जोरात हाकला .त्याच्या वेगाने घाबरणारे तारकासमूह पाहून त्याला मजा वाटत होती "हाहाहा घाबरट कुठले ..भित्रीभागुबाई !!!" फेट्न हसत होता आणि अचानक.... रथा समोर एक भला मोठा विंचू आला
ओरायन शिकार्याला मारणारा हाच तो वृश्चिक तारकासमूहाचा विंचू .त्याला पाहून रथाचे घोडे घाबरले ..विंचवाने रथावर  नांगी  उगारली ..फेट्न आता घाबरला ..घोडे आता बेफाम झाले .विंचवापासून वाचण्यासाठी फेट्न ने रथ कसाबसा वळवला  पण नेमका पृथ्वीच्या दिशेने ...रथ आता वेगात पृथ्वीकडे जात होता ..पृथ्वीवर हाहाकार उडाला .तापमान वाढू लागल ..नद्या कोरड्या पडू लागल्या ..आता पृथ्वी नष्ट होणार कि काय?
इतक्यात देवांच्या राजा झिउस ने ते पाहिलं  आणि पृथ्वीला वाचवायला आपलं वज्र रथावर फेकलं .धुडूमं धुम मोठा आवाज झाला ..काही कळायच्या आत फेट्न रथातून खाली कोसळला.
फेट्न खाली कोसळत होता ,त्याच्या डोळ्या पुढे अंधेरी येत होती घाबरलेल्या फेट्न ला आता वाटत होत मी खरच मोठ्यांचं ऐकायला हवं होत ..त्याचे डोळे मिटले…

फेट्न ने मोठ्या मुश्किलीने डोळे उघडले ..समोर बाबा अपोलो ,देवराज झिउस ,मित्र सिग्नस उभे होते .”काय झालं ?मी कसा काय वाचलो?”फेट्न ने विचारल .”बाळा,काय केलास तू हे ?तुझ्या मित्र सिग्नस मुळे तू वाचलास.
तू रथातून पडणार असं दिसताच सिग्नस ने  एरिडेनस या नदी देवाची प्रार्थना केली त्यामुळे तू  खाली पडायच्या आत ने तुला झेलल.तू पाण्यात पडल्यावर सिग्नस ने हंसाच रूप घेऊन खोल पाण्यातून तुला वाचवलं” फेट्न च्या डोळ्यात आता पाणी होत.”धन्यवाद मित्रा सिग्नस ,मला माफ करा बाबा आणि देवराज झिउस. मी आता

Oct 3, 2017

वर्ल्ड स्पेस विक -जागतिक अंतराळ सप्ताह



दरवर्षी जगभर ४ ते १० ऑक्टोंबरच्या दरम्यान जागतिक अंतराळ सप्ताह (World Space Week)साजरा केला जातो.हा जागतिक स्तरावर साजरा होणारा सगळ्यात मोठा खगोलीय कार्येक्रम आहे असं म्हटल्यास वावग ठरू नये.जगभरातल्या अनेक देशातील अवकाश संशोधन संस्था,खगोलीय संस्था,हौशी मंडळे,शाळा ,महाविद्यालये हा उपक्रम राबवतात.जागतिक अंतराळ सप्ताह संस्थेकडून दरवर्षी एक विषय ठरवला जातो.या विषयाला अनुसरून वेगवेगळे उपक्रम,स्पर्धा,व्याख्याने ,प्रदर्शन असे विविध कार्येक्रम अगदी जगभर होतात.

इतिहास -
मानवाच्या पहिल्या चांद्रसफरीच्या यशानिमित्त अंतराळ सप्ताह साजरा करण्यासाठी १९८०साली "जागतिक अंतराळ सप्ताह संस्था " [World Space Week Association (WSWA) ] स्थापन झाली.जुलै १९८० मध्ये पहिला असा सप्ताह अमेरिकेतल्या टेक्सास राज्यातील ह्युस्टन येथे साजरा झाला.१९९९ पर्यंत १५ देशात या कल्पनेचा प्रसार झाला.
६ डिसेंबर १९९९ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत असा एक सप्ताह जागतिक स्तरावर साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडण्यात आला.त्यानुसार ४ ते १०ऑक्टोंबर हा आठवडा अंतराळ सप्ताह साजरा करावा असे ठरवण्यात आले.या २ तारखांचे देखील विशेष महत्व आहे. 
४ ऑक्टोंबर १९५७साली तत्कालीन सोव्हियत रशियाने पहिला मानव निर्मित उपग्रह स्पुटनिक-१ अवकाशात पाठवला होता.तर १० ऑक्टोंबर १९६७ साली जगभरातल्या सर्व देशांनी अवकाशाचा उपयोग हा युद्धासाठी नाही तर नेहमी शांतता आणि संशोधनासाठी केला जावा या संकेताला मान्यता दिली होती.२००० साला पासून हा सप्ताह जगभर साजरा केला जातो आहे.२०१६ साली ८६ देशांमध्ये सुमारे २७०० वेगवेगळे कार्येक्रम या निमित्ताने आयोजित केले गेले होते.
सप्ताहाची "थीम"-
जागतिक अंतराळ सप्ताह संस्थेकडून  या सप्ताहासाठी दरवर्षी एक विषय ठरवला जातो.
या थीम ला अनुसरून जगभर विविध कार्येक्रमांचे आयोजन होते. 

२००० साली पहिल्यांदा जागतिक स्तरावर साजर्या झालेल्या या सप्ताहाचा विषय होता-अंतराळ सहस्रकाचा आरंभ  ("Launching the Space Millennium).२००२ या वर्षीसाठी विषय होता अंतराळ आणि आपले दैनंदिन जीवन.१९५७ साली मानवाने पहिला उपग्रह अवकाशात पाठवल्याच्या घटनेला २००७ साली ५० वर्ष पूर्ण झाली त्या निमित्ताने त्यावर्षीचा विषय होता -अंतराळातील 50 वर्षे .
 
२०१५ चा सप्ताह आत्ता पर्यंत लागलेल्या विविध खगोलीय शोधांना समर्पित होता.२०१६ चा विषय होता भविष्याला सक्षम बनवणारे दूरस्थ संवेदन(Remote Sensing – Enabling our Future)  

२००० साला पासून चे वेगवेगळे विषय पुढील प्रमाणे -
२०००-Launching the Space Millennium
२००१- Inspiration from Space
२००२- Space and Daily Life
२००३-Space: Horizon Beyond Earth
२००४-Space for Sustainable Development
२००५- Discovery and Imagination
२००६- Space for Saving Lives
२००७- 50 Years in Space
२००८ -Exploring the Universe
२००९-Space for Education
२०१०-Mysteries of the Cosmos
२०११-50 Years of Human Spaceflight
२०१२-Space for Human Safety and Security
२०१३-Exploring Mars – Discovering Earth
२०१४-Space: Guiding Your Way
२०१५-Discovery
२०१६-Remote Sensing – Enabling our Future


या वर्षी २०१७ सालची थीम आहे -अवकाशात नव्या जगाचा शोध (Exploring New Worlds in Space)


यात प्रामुख्याने अंतराळात  सजीव सृष्टीचा शोध घेण्याचे प्रयत्न ,न्यू होरायझन्स सारखे  अॅस्ट्रोबायोलॉकल  मोहिमा यांच्यावर वर भर असेल . तसेच  पाणी ,धातू ,उर्जा यांसारख्या पृथ्वीवर संपत चाललेल्या  पदार्थाना अंतराळातून पृथ्वीवर आणता येऊ शकेल का ? त्या दृष्टीने कोणत्या मोहिमा सध्या आखल्या गेल्या आहेत  याविषयी देखील चर्चा होईल.  

भारतात इस्रो , विक्रम साराभाई अंतराळ केंद्र,इस्रो इनर्शियल सिस्टम युनिट यासारख्या   अवकाश आणि तंत्रज्ञानाशी सबंधित इतर सरकारी संस्था,विद्यापीठे,हौशी खगोल प्रेमी संस्था ,तारांगणे विविध कार्येक्रमांचे आयोजन केले जाते.नाशिक महानगरपालिका देखील इतर खगोलप्रेमी संस्थांच्या सहकार्याने जागतिक अंतराळ सप्ताहात विविध उपक्रम राबवते .हा सप्ताह  साजरी करणारी नाशिक मनपा ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे.

सर्व खगोल प्रेमीना जागतिक अंतराळ सप्ताहाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!