दिवाळी नंतरची दिवाळी - सिंहस्थ उल्कावर्षाव

पृथ्वीवरची आपली दिवाळी संपली असली तरी आकाशातली एक दिवाळी अजून बाकी आहे.ती म्हणजे सिंहस्थ उल्कावर्षाव.दरवर्षी १४ ते २२ नोव्हेंबर दरम्यान उल्कांची आतषबाजी दिसते. त्याचे केंद्र सिंह तारकासमूहात असल्या सारखे ‘दिसत' असल्याने याला सिंहस्थ किंवा लिओनिड्स असे म्हणतात.
उल्का म्हणजे काय?
अंधाऱ्या रात्री आकाशात सर्रऽऽर्कन् एखादी प्रकाश रेषा चमकून जाताना आपल्याला दिसते.त्याला आपण तारा तुटला असं म्हणतो. प्रत्यक्षात तारे कधीही तुटत नाही. आपल्याला पडताना दिसणारी चमकती गोष्ट असते उल्का.

अवकाशात धूमकेतू किंवा लहान-मोठे लघुग्रह यांच्या मार्गात अनेक धूळ आणि दगड आणि अनेक छोट्या अ-ग्रहीय वस्त असतात त्यांना उल्काभ (मिटिअरॉइड) असे म्हणतात.
असे उल्काभ जेव्हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीकडे खेचले जातात,तेव्हा वातावरणाशी घर्षण होऊन ते जळतात आणि आपल्याला त्याची प्रकाश शलाका दिसते.याला आपण उल्का(मिटिअर) असे म्हणतो.
बरेचसे उल्काभ वातावरणात पूर्णपणे जळून जातात,पण काही मोठे उल्काभ पृथ्वीवर येऊन आदळतात त्यांना अशनी (मिटिअराइट) म्हटले जाते.
उल्कावर्षाव म्हणजे काय?
पृथ्वीवर रोजच सुमारे काही हजार टन एवढ्या वस्तुमानाचे दगड येत असतात.पण आकाराने फारच लहान आपल्याला ते जाणवत नाही. पण वर्षातले काही दिवस असे असतात जेव्हा एखाद्या ठराविक दिशेतून हमखास उल्का पडतांना दिसतात.जेव्हा एका रात्रीत ताशी साधारण वीसपेक्षा जास्त उल्का पडताना दिसतात, तेव्हा त्याला ‘उल्कावर्षाव’ असं म्हटल जात

उल्कावार्षावाचे कारण -
बहुतांश उल्कावर्षावाचे प्रमुख कारण आहेत धूमकेतू.आपल्या सूर्यमालेत अनेक धुमकेतू सूर्याभोवती मोठी प्रदक्षिणा घालत फिरत आहेत..
धूमकेतू पुढं निघून गेला, तरी त्याच्या शेपटीतली धूळ त्याच्या मार्गात साठून राहते आणि अश्या धुळीचा सूर्याभोवती बांगडी सारखा पट्टाच तयार होतो.वर्षातल्या काही ठराविक दिवसात आपली पृथ्वी या पट्ट्याजवळून जात असते, तेव्हा त्यातली ही धूळ पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळं पृथ्वीकडे खेचली जाते. आणि आपल्याला उल्कावर्षाव दिसतो.

उल्कावार्षावाचे केंद्र आणि नाव
रात्रीच्या आकाशात उल्का पडताना प्रत्येक उल्केची एक प्रकाशाची रेघ तयार झालेली आपल्याला दिसते . अशी प्रत्येक प्रकाश शलाका आकाशात मागे वाढवली, तर त्या साऱ्या रेषा जणू एका बिंदूतून निघाल्यासारख्या दिसतात. त्याला आपण उलाक्वर्षावाचे केंद्र म्हणू शकतो.असे केंद्र ज्या तारकासमूहात असल्याचे आपल्याला दिसते त्या तारकासमूहाच्या नावाने तो उल्का वर्षाव ओळखला जातो.
उदाहरणार्थ मिथुन म्हणजे ‘जेमिनी’ तारकासमुहातून होणारा उल्कावर्षाव ‘जेमिनिड्स’ म्हणून ओळखला जातो मृग -ओरायनमधील ‘ओरिओनिड्स’,ययाती -पर्सियस मधील पर्सिड्स (Perseids) अशी हि नावं आहेत.
सर्वोच्च वर्षावाचा दिवस
प्रत्येक उल्कावर्षावाच्या कालावधातीत रोज थोड्या फार उल्का पडताना दिसतात पण एका विशिष्ट दिवशी सर्वाधिक उल्का वर्षाव होताना दिसतो.
२३ जुलै ते २२ ऑगस्ट या दरम्यान होणार्या पर्सिड्स उल्कावर्षावात १२ऑगस्ट ला सर्वाधिक म्हणजे सरासरी ताशी ८० पडताना दिसतात.
१४ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत होणारा उल्कावर्षाव सिंह तारका समूहातून होताना दिसतो म्हणून त्याला सिंहस्थ उल्कावर्षाव किंवा लिओनिड्स(Leonids meteor shower) म्हटले जाते . हा उल्कावर्षाव टेम्पल-टटल या धूमकेतूमुळे होतो.याच्या सर्वोच्च वर्षावाची रात्र १७ -१८ नोव्हेंबर असते.
सिंहस्थ उल्कावर्षाव केव्हा आणि कुठे पहावा ?
शुक्रवारी १७ तारखेच्या रात्री सर्वाधिक उल्का बघता येतील. १८ तारखेला शनिवारी रात्री सुद्धा हा उल्का वर्षाव बघता येईल. अमावस्या असल्याने चंद्र प्रकाशाचा त्रास होणार नाही.
उल्का वर्षाव पाहण्यासाठी शहरापासून लांब अंधारी जागा,मैदान किंवा उंच अंधारी टेकडी असेल तर फारच
उत्तम.हे शक्य नसल्यास आपल्या घराच्या गच्चीवरुन किंवा किंवा मैदानावरून उल्कापात बघता येऊ शकतो,प्रकाशाच्या प्रदुषणामुळे कमी प्रमाणात उल्का दिसतील. पण अगदीच काही ण बघण्यापेक्षा हे बरं.
उल्का वर्षावाचा केंद्र असणारी सिंह रास साधारण मध्यरात्री नंतर उगवेल.उत्तर रात्री ३:०० वाजे पर्यंत ती डोक्यावर आली असेल. हि उल्कावर्षाव बघण्याची सर्वोत्तम वेळ. त्याच्या आधी सुद्धा तुरळक उल्का दिसतील. जमिनीवर सतरंजी किंवा अंथरुण घालून त्यावर झोपून आकाशाचं संपूर्ण दृश्य पाहता आलं तर त्यासारखं दुसरं सुख नाही.आरामखुर्ची हा सगळ्यात उत्तम पर्याय त्यामुळे फक्त डोक्यावरच आकाश नाही तर क्षितिजालगतचं आकाश पण दिसू शकत.रात्रीच्या कडकयच्या थंडी साठी गरम कपडे आवश्यक आहेत.खूप वेळ निरीक्षण करणार असाल तर अधून मधून वाफाळता चहा पण हवा.
सिंह रास कशी ओळखावी?
सिंह रास ओळखण्याची सगळ्यात सोप्पी खुण म्हणजे त्यातल्या मघा नक्षत्राचा उलट्या प्रश्न चिन्हा सारखा आकार. ६ ताऱ्यांचे मिळून विळ्यासारखा एक आकार तयार होतो. त्याच्या मागए एक ३ तार्यांचा काटकोन त्रिकोण दिसतो. हे सर्व जोडले कि सिंह तारकासमूह तयार होतो.
उत्तरेला पतंगी सारख्या आकाराचा सप्तर्षी हा सगळ्यांना ओळखता येणारा तारकासमूह. सप्तर्षी मधले पहिले दोन तार्यान मधून एक काल्पनिक रेषा काढली कि ती उत्तरेकडे ध्रुव तार्याकडे जाते .तीच काल्पनिक रेषा मागे वाढवली कि सिंह तारकासमूह दर्शवते.

उल्कावर्षाव हा सध्या डोळ्यांनीच बघायचा असतो त्याच्या साठी दुर्बिणीची गरज नाही.मागच्या वर्षी चंद्र प्रकाशामुळे सिंहस्थ उल्कावर्षाव विशेष दिसला नव्हता. या वर्षी अमावस्या असल्याने हि अडचण होणार नाही. १७ ताखेच्या रात्री मित्रांसोबत एखाद्या अंधार्या जागी जाऊन रात्रभर हा उल्कावर्षाव बघू शकतात. १७ ला जमले नाही तर १८ च्या रात्री सुद्धा हा उल्कापात बघून दुसर्या दिवशी रविवारी झोपेची भरपाई करू शकतात.अगदीच नाही जमल तर १७ च्या रात्री २:३० चा गजर लाऊन जमेल तितका वेळ आपल्या घराच्या गच्ची वरून लिओनिड्स बघू शकतात.एका तासात किती उल्का दिसल्या याची तुम्ही नोंद ठेऊ शकतात.
थोडक्यात आपल्याला जमेल तिथून ,जमेल तितक्या वेळ ,जमेल तसं सिंहस्थ उल्कावर्षावाचा आनंद घ्या.आकाशातली हि नैसर्गिक आतिषबाजी बघायची संधी सोडू नका!!!!!