तारकासमूह ((Constellation: )याचा अर्थ होईल जवळजवळ वाटणाऱ्या तार्यांची विशिष्ट मांडणी .
आधुनिक खगोलशास्त्रामध्ये तारकासमूह म्हणजे फक्त तार्यांची विशिष्ट मांडणी नाही तर ते इंटरनॅशनल अॅस्ट्रॉनॉमिकल युनियनने (आय.ए.यू.ने) ठरवलेले खगोलावरील विशिष्ट क्षेत्र आहे.
ताऱ्यांचे निरीक्षण करताना आपल्या पूर्वजांना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे ताऱ्यांचे परस्पर सापेक्ष स्थान बदलत नाही.त्यामुळे त्यांची एक विशिष्ट रचना आकाशात कायम राहते उदाहरणार्थ उत्तर दिशेला दिसणाऱ्या ह्या ७ तार्यांची पतंग किंवा खाटीकाच्या सुऱ्या सारखी वाटणारी रचना कायम राहते . हे ७ तारे याच रचनेत उगवतात आणि मावळतात .
रात्रीच्या ताऱ्यांनी खचाखच भरलेल्या आकाशात एकूण एक तार्यालाओळखणे ,नाव देणे हे अगदीच अशक्य कोटीतले काम . त्या पेक्षा या ताऱ्यांच्या समूहाला ओळखणे सोपे वाटू लागले .अमूर्तातून ओळखीचे आकार शोधणं हा तर मानवी मनाचा आवडता छंद .म्हणून आपण लहानपणी ढगांच्या वेड्यावाकड्या आकारात कधी ससा ,हत्ती पासून तर अगदी डायनोसॉर पर्यंतची कल्पना करण्याचा खेळ खेळायचो .आपल्या आदिम पूर्वजांनी पण अगदी हेच केलं. या ताऱ्यांच्या विशिष्ठ समूहामध्ये वेगवेगळे प्राणी,पक्षी,झाडे यांचे आकार पाहायला सुरवात केली.कोणाला त्यात सिंह दिसला , कोणाला मोर ,कोणाला साप तर कोणाला गरुड . जंगली,पाळीव ,जलचर ,सरीसृप , पक्षी हे कमी होते कि काय म्हणून ड्रॅगन , पंख असलेला घोडा ,युनिकोर्न या सारखे काल्पनिक प्राण्यांची सुद्धा त्यात भर पडली .जश्या जश्या संस्कृती प्रगत होत गेल्या तसे तसे या रचनेत मानवी,दैवी आकार दिसायला सुरुवात झाली . हे या ताऱ्यांचे समूह म्हणजे तारकासमूह .
माणूस हा मुळातच गोष्टीवेल्हाळ प्राणी . त्यामुळे या तारकासमूहांविषयी माणसाने दंतकथा रचल्या नसत्या तर नवल होत .व्यापारी ,हौशी प्रवासी ,यांच्या माध्यमातून या कथा ,तारकासमूहांची नावे देशोदेशी पसरल्या.
एकाच तारकासमूहाच्या आकृतीत वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या कल्पना लढवल्या .उलटं प्रश्नचिन्ह आणि त्याच्या मागे एक त्रिकोण या ताऱ्यांच्या आकृतीत ग्रीक लोकांना बसलेला सिंह दिसला तर चिनी लोकांना उडणारा पिवळा ड्रॅगन. भारतीय लोकांनी विळ्यासारखा आकार म्हणजे पालखी मानली (मघा नक्षत्र ) तर उरलेला भाग म्हणजे पलंग मानला (पूर्वा -उत्तर फाल्गुनी)."पिंडे पिंडे मतिर्भिन्ना" दुसर काय?
यात पण कधी कधी काही तरी समानता आढळते..मिथुन तारकासमूहाच्या आकृतीत ग्रीक लोकांना जुळे भाऊ दिसले तर अरबांना जुळे मोर .भारतीयांना त्यांना जुळे राक्षस मानले (पुनर्वसू) तर आदिवासी लोकांना ते जुळे झाडे वाटली .सगळ्यांनी त्याला जुळेच मानले हे विशेष !!
अशा प्रकारची काल्पनिक विभागणी करायला अगदी अश्मयुगापासूनच सुरवात झाली होती.
फ्रांस जवळील लास्को इथल्या गुफाचित्रांत याचा पुरावा सापडतो .इजिप्त ,ग्रीस ,रोमन इथल्या अनेक प्राचीन शिल्पाकृतीत हे तारकासमूह दिसतात .प्राचीन इराक जवळच्या युफ्राटेस प्रांतात मिळालेल्या अवशेषांवरून कळते कि त्या काळी (इसपु ४०००) लोकांनी सिंह,वृषभ,वृश्चिक हे तारकासमूह मानले होते .प्राचीन भारतीयांनी फक्त आयनिक वृत्तावरील नक्षत्रांना महत्व देत इतर तारकासमूहांकडे थोडे दुर्लक्ष केल..ऋग्वेदात २७ नक्षत्रांसोबतच मृगाजवळचा कुत्रा (कॅनिस मेजर ), ऋक्ष (उर्सा मेजर) यांचे उल्लेख येतात.ग्रीक कवी अरेटस (इसपु २७५) याच्या "द फेनामेना"या काव्यात काही तारका समूहांचा उलेख आढळतो. हिप्पार्कस(इसपु १५०) या ग्रीक खगोल शास्त्रज्ञाने आकाशाचे नकाशे तयार केले.
आपल्याला आज माहित असलेल्या आधुनिक तारकासमूहांची कल्पना इ स दुसऱ्या शतकापासून पुढे आली. ग्रीक तत्वज्ञ टॉलेमी ने आला ४८ तारकासमूहांची यादी बनवली .यात प्रामुख्याने उत्तर गोलार्धातून दिसणारे तारकासमूहच होते .टॉलेमीचे हे ४८ तारकासमूह पुढे अनेक शतके सर्वमान्य ठरले . पुढे १६ व्या शतकांत युरोपातील साहसी दर्यावर्दी दक्षिण गोलाधार्थ प्रवास करू लागले . तिथे त्यांना अनेक नवे तारकासमूह दिसले जे उत्तरी गोलार्धातून दिसत नव्हते . सतराव्या शतकाच्या आरंभी जोहान बायर याने दक्षिणी गोलार्धातील दिसणाऱ्या १२ नव्या तारकासमूहांची भर टाकून आकाशाचा नकाशा तयार केला .आता तारकासमूहांची संख्या झाली ६०.
जोहानचा सहकारी जॅकोब बर्श्च याने नरतुरंग या मोठ्या तारकासमुहातून काही तारे वेगळे करून त्रिशंकू हा नवा तारकासमुह बनवला . असेच नवे ३ तारकासमुह त्याने या यादीत जोडले . याच काळात टायको ब्राहेने सिंह आणि कन्या तारकासमुहाजवळील काही ताऱ्यांचा अरुंधती केश तारकासमुह बनवला . या यादीत १६८७ मध्ये जोहानस हॅवेलीअस या जर्मन खगोलतज्ज्ञाने ७ तारकासमुहाची भर टाकली . पुढे निकोलस लुईस दि लाकाईल याने दक्षिणी गोलार्धातील १४ नवे तारकासमूह बनविले .
जुन्या तारकासमुहातुन काही तारे वेगळे करून नवे तारकासमुह बनवण्याची चढाओढ वाढू लागली .यातून गोंधळाची स्थिती निर्माण झाली . हा सावळा गोंधळ टाळण्यासाठी १९३० मध्ये इंटरनॅशनल अॅस्ट्रॉनॉमिकल युनियनने (आय.ए.यू.) या आंतरराष्ट्रीय संस्थेने आकाशाची विभागणी करून ८८ तारकासमूह सुनिश्चित केले . या तारकासमूहांच्या सीमारेषा निश्चित केल्या आणि त्या क्षेत्राच्या आत येणारे सगळे अवकाशीय घटक (तारे , तारकापुंज इत्यादी ) हे त्या तारकासमूहाचे घटक असतील असे ठरविण्यात आले . हेच आजचे परिचित ८८ तारकासमूह!
यातील बहुतांश तारकासमूहाना मराठी नावे नव्हती .दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी पाश्च्यात्य नावांचे भारतीयकरण केले .त्यांनी नावांचे फक्त शब्दश: भाषांतर केले नाही तर ज्या प्रमाणे पाश्चात्यांनी ग्रीक पुराणांतील वेगवेगळ्या कथांचा वापर केला तश्याच प्रकारे जांभेकरांनी भारतीय पुराण कथांचा खुबीने वापर केला. उदाहरणार्थ उत्तर आकाशातील शर्मिष्ठा (Cassiopeia) ,देवयानी (Andromeda),ययाती (Perseus) आणि वृषपर्वा (Cephus) हे तारकासमूह महाभारतातील एका कथेत गुंफल्याचे आपल्याला आढळते.
८८ तारकासमुहांची यादी पुढील प्रमाणे :
संदर्भ :
तारांगण -प्रदीप नायक
मराठी विश्वकोश
आकाशाशी जडले नाते -जयंत नारळीकर
अवकाशवेध
खगोलमंडळ

| क्र. | तारकासमूह | Name |
| १. | देवयानी | Andromeda |
| २. | वाताकर्ष | Antlia |
| ३. | कपोत | Apus |
| ४. | कुंभ | Aquarius |
| ५. | गरूड | Aquila |
| ६. | पीठ | Ara |
| ७. | मेष | Aries |
| ८. | सारथी | Auriga |
| ९. | भूतप | Bootes |
| १०. | सीलम | Caelum |
| ११. | करभ | Camelopardalis |
| १२. | कर्क | Cancer |
| १३. | शामशबल | Canes Venatici |
| १४. | बृहदलुब्धक | Canis Major |
| १५. | लघुलुब्धक | Canis Minor |
| १६. | मकर | Capricornus |
| १७. | नौकातल | Carina |
| १८. | शर्मिष्ठा | Cassiopeia |
| १९. | नरतुरंग | Centaurus |
| २०. | वृषपर्वा | Cepheus |
| २१. | तिमिंगल | Cetus |
| २२. | वायुभक्ष | Chamaeleon |
| २३. | कर्कटक | Circinus |
| २४. | पारावत | Columba |
| २५. | अरुंधती केश | Coma Berenices |
| २६. | दक्षिण मुकुट | Corona Australis |
| २७. | उत्तर मुकुट | Corona Borealis |
| २८. | हस्त | Corvus |
| २९. | चषक | Crater |
| ३०. | त्रिशंकू | Crux |
| ३१. | हंस | Cygnus |
| ३२. | धनिष्ठा | Delphinus |
| ३३. | असिदंष्ट | Dorado |
| ३४. | कालेय | Draco |
| ३५. | अश्वमुख | Equuleus |
| ३६. | यमुना | Eridanus |
| ३७. | अश्मंत | Fornax |
| ३८. | मिथुन | Gemini |
| ३९. | बक | Grus |
| ४०. | शौरी | Hercules |
| ४१. | कालयंत्र | Horologium |
| ४२. | वासुकी | Hydra |
| ४३. | अलगद | Hydrus |
| ४४. | यम | Indus |
| ४५. | सरठ | Lacerta |
| ४६. | सिंह | Leo |
| ४७. | लघु सिंह | Leo Minor |
| ४८. | शशक | Lepus |
| ४९. | तूळ | Libra |
| ५०. | वृक | Lupus |
| ५१. | गवय | Lynx |
| ५२. | स्वरमंडळ | Lyra |
| ५३. | त्रिकूट | Mensa |
| ५४. | सुक्ष्मदर्शी | Microscopium |
| ५५. | शृंगाश्व | Monoceros |
| ५६. | मक्षिका | Musca |
| ५७. | अंकनी | Norma |
| ५८. | अष्टक | Octans |
| ५९. | भुजंगधारी | Ophiuchus |
| ६०. | मृग | Orion |
| ६१. | मयूर | Pavo |
| ६२. | महाश्व | Pegasus |
| ६३. | ययाती | Perseus |
| ६४. | जटायू | Phoenix |
| ६५. | चित्रफलक | Pictor |
| ६६. | मीन | Pisces |
| ६७. | दक्षिण मस्त्य | Piscis Austrinus |
| ६८. | अरीत्र | Puppis |
| ६९. | होकायंत्र | Pyxis |
| ७०. | जालक | Reticulum |
| ७१. | शर | Sagitta |
| ७२. | धनू | Sagittarius |
| ७३. | वृश्चिक | Scorpius |
| ७४. | शिल्पकार | Sculptor |
| ७५. | ढाल | Scutum |
| ७६. | भुजंग | Serpens |
| ७७. | षडंश | Sextans |
| ७८. | वृषभ | Taurus |
| ७९. | दुर्बीण | Telescopium |
| ८०. | उत्तर त्रिकोण | Triangulum |
| ८१. | दक्षिण त्रिकोण | Triangulum Australe |
| ८२. | कारण्डव | Tucana |
| ८३. | सप्तर्षी | Ursa Major |
| ८४. | ध्रुवमस्त्य | Ursa Minor |
| ८५. | नौशीर्ष | Vela |
| ८६. | कन्या | Virgo |
| ८७. | शफरी | Volans |
| ८८. | जंबुक | Vulpecula |
संदर्भ :
तारांगण -प्रदीप नायक
मराठी विश्वकोश
आकाशाशी जडले नाते -जयंत नारळीकर
अवकाशवेध
खगोलमंडळ

No comments:
Post a Comment