सिंह तारकासमूह
८८ तारका समूहांतील खूप मोजके तारका समूह असे आहेत ज्यांचे काल्पनिक आकार त्यांच्या आकाशातील आकारात दिसू शकतो. त्यातील एक म्हणजे सिंह तारकासमूह. याच्या ठळक आकारा मुळे हा अगदी सहज ओळखता येतो.
सिंह हा देखील आयनिक वृत्तावरील तारका समूह असल्याने राशी आहे .या या राशीत सूर्य १६ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर दरम्यान असतो. हा १५ एप्रिलच्या सुमारास रात्री ९ वाजता मध्यमंडलावर येतो.याचे इंग्रजी नाव Leo हे सिंह या अर्थाचा लॅटिन शब्द आहे.दुसऱ्या शतकातील खगोलशास्त्रज्ञ टॉलेमी यांनी बनवलेल्या ४८ तारकासमूहांच्या यादीत याचा समावेश होता.इस पु १०५०० मध्ये वसंत संपात बिंदू सिंह राशीत होता .
स्थान- सिंहाचे
स्थान हे आयनिक वृत्त जवळ आहे. यातील प्रमुख तारा मघा हा तर पूर्ण पणे
आयनिक वृत्तावर आहे.
ह्याची व्याप्ती होरा(Right ascension) ९ ता. १८ मि.
ते १५ ता. ५६ मि. आणि क्रांती(Declination) –६० ४′ ते + ३३० ३′ या मर्यादेत
आहे.
ह्याची व्याप्ती होरा(Right ascension) ९ ता. १८ मि.
ते १५ ता. ५६ मि. आणि क्रांती(Declination) –६० ४′ ते + ३३० ३′ या मर्यादेत
आहे.
याच्या
पूर्वेला अरुंधती केश,आग्नेयेला कन्या , दक्षिणेला षडंश,नैऋत्येला
वासुकी,पश्चिमेला कर्क,वायव्येला गवय,उत्तरेला लघु सिंह हे तारका समूह
आहेत.
आकार - याने आकाशाचा ९४७ चौरस अंश भाग व्यापला आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीत याचा १२ व क्रमांक लागतो .
हा
तारकासमूह म्हणजे पश्चिम दिशेकडे तोंड करून निवांत बसलेला सिंह मानलं
जातो.यातील आल्फा, गॅमा, ईटा, झीटा, म्यू आणि एप्सायलॉन लिओनीस या सहा
ताऱ्यांचा विळा किंवा उलट्या प्रश्न चिन्हासारखा आकार म्हणजे सिंहाचे
डोके. तर बीटा लिओनीस, डेल्टा व थीटा लिओनीस या तीन ताऱ्यांनी तयार
होणारा त्रिकोण म्हणजे सिंहाचा पार्श्वभाग या सर्व नऊ ताऱ्यांचा मिळून
सिंहासारखा आकार होतो.
हा
तारकासमूह म्हणजे पश्चिम दिशेकडे तोंड करून निवांत बसलेला सिंह मानलं
जातो.यातील आल्फा, गॅमा, ईटा, झीटा, म्यू आणि एप्सायलॉन लिओनीस या सहा
ताऱ्यांचा विळा किंवा उलट्या प्रश्न चिन्हासारखा आकार म्हणजे सिंहाचे
डोके. तर बीटा लिओनीस, डेल्टा व थीटा लिओनीस या तीन ताऱ्यांनी तयार
होणारा त्रिकोण म्हणजे सिंहाचा पार्श्वभाग या सर्व नऊ ताऱ्यांचा मिळून
सिंहासारखा आकार होतो.
सिंह कसा ओळखावा - सिंह आकाशात शोधण्यासठी सुपरिचित सप्तर्षी या तारका समुहाचा उपयोग होतो. सप्तर्षीमधील ज्या पहिल्या२ तार्यांनीआपण ध्रुवतारा शोधतो तीच काल्पनिक रेषाजर विरुद्ध बाजूला वाढवली तर सिंहापाशी येते .किंवा अजून सोप्या पद्धतीने सांगायचं तर सप्तर्षी हे एक फ्रायिंग पॅन मानलं ज्यात काही तरी शिजतंय .तर या पॅन मधील अन्न थेट सिंहाच्या तोंडात पडेल.
सिंह हा मानवाला खूप आधी पासून परिचित तारका समूह आहे . मेसोपोटामियन लोकांना हा इ.स.पु. ४००० मध्ये माहित होता असे पुरातत्वीय पुरावे मिळाले आहेत.
बहुतांश संस्कृतीत याला सिंह हा प्राणी मानलं गेलं आहे.पर्शिअन लोकांनी याला शेर किंवा सर म्हटल तर बेबेलिओन संस्कृतीत उर्गुला (मोठा सिंह ). चीनि खगोल शास्त्रात यातील वरचे तारे मिळून पिवळा ड्रॅगन मानला गेला होता आणि देनेबोला तारा म्हणजे पिवळा सम्राट ह्यून्गदि.
प्राचीन ईजिप्शियन मध्ये सूर्याचा सिंह राशीत प्रवेश झाल्या नंतर नाईल नदीला पूर यायचा. या पुरातून वाहून आलेल्या सुपीक मातीमुळे पीकपाणी चांगले होत.याच वेळी वाळवंटी सिंह नाईल नदीजवळ दिसायचे त्यामुळे सिंह तारकासमूह हा समृद्धीचा प्रतीक मानला गेला
ग्रीक पुराण कथांनुसार हर्क्युलस याला १२ साहसी कामे करायची होती. त्यातील एक म्हणजे अत्यंत विक्राळ नरभक्षक नेमिअन सिंहाला मारणे. या सिंहाची कातडी कुठल्याच शस्त्राने न भेदली जाऊ शकणारी होती म्हणून हर्क्युलसने त्याला हाताने मारले या पराक्रमाने प्रभावित झ्यूसने त्या सिंहाला सुद्धा आकाशात स्थान दिले.
प्रमुख तारे :सिंहमध्ये अनेक तेजस्वी तारे आहेत. यामध्ये १ किंवा २ दृश्यप्रतीचे चार तारे आहेत ज्यांमुळे हा तारकासमूह ठळकपणे दिसतो. यातील प्रमुख तारे पुढील प्रमाणे -
α Leonis- रेग्यूलस(Regulus)β Leonis- डेनेबोला (Denebola)
γ Leonis- अल्जीबा (Algieba)
δ Leonis - झोस्मा(Zosma)
ξ Leonis - अल जेनबी (Algenubi)
η Leonis- अल जबाह( Al Jabhah)
ζ Leonis- अधाफेरा (Adhafera)
μ Leonis- Rasalas
α Leonis-रेग्यूलस- हा सिंहेतील सर्वात तेजस्वी तारा असून तो एक निळा-पांढरा मुख्य अनुक्रम तारा (main-sequence star)आहे. याची दृश्यप्रत १.३४ असून तो पृथ्वीपासून ७७.५ प्रकाश-वर्षे अंतरावर आहे.
हा एक द्वैतीतारा आहे.द्विनेत्री किंवा २" दुर्बीणीतुन आपल्याला याचा जोडीदार दिसतो. म्हणजे Aआणि B असे हे २ तारे आहेत. मोठ्या दुर्बिणीतून पाहिलं तर याचा जोडीदारB पण द्वैती दिसतो. B हा orange dwarfअसून C हा Red dwarf आहे. हे २ तारे एकमेकांपासून 2,000 दूर आहेत.गंमत म्हणजे A सुद्धा द्वैती आहे पण तो दुर्बिणीतून दिसू शकणार नाही. कारण तो वर्णपटलीय द्वैती आहे .यातील एक तारा blue-white main sequence star आहे तर दुसरा white dwarf. थोडक्यात रेग्यूलस हा ४ ताऱ्यांचा समूह आहे .यातील A हा सूर्यापेक्षा ३.५ पट मोठाअसून खूप जोरात स्पिन करतो याचा फिरण्याचा वेग १५. तास आहे यामुळे याचा आकार गोल नसून अंडाकृती आहे .
β Leonis डेनेबोला -हा पृथ्वीपासून ३६ प्रकाश-वर्षे अंतरावरील २.२३ दृश्यप्रतीचा निळा-पांढरा तारा आहे. डेनेबोला याचा अर्थ "सिंहाची शेपटी" असा आहे.


