Showing posts with label बायर. Show all posts
Showing posts with label बायर. Show all posts

Jun 5, 2017

ताऱ्यांच 'बारस'


                                               ताऱ्यांना नावे कशी दिली जातात ?
दिसेल त्याला नाव ठेवणं हा तर माणसाचा स्वभाव .तारे सुद्धा यातून सुटले नाही .अगदी  प्राचीन काळा पासून ताऱ्यांचा बारसं करण्याचे उद्योग चालू आहेत .ठळक दिसणाऱ्या ताऱ्यांना स्वतंत्र नावे दिली गेली .
व्याध ,अगस्ती ,अभिजित ,स्वाती हि तेजस्वी मंडळी .ध्रुवतारा अंधुक असून पण त्याच्या वैशिष्ठ्या मुळे नाव धरून होता.

सगळ्याच संस्कृतीतल्या लोकांनी ताऱ्यांना आपल्या देवतांची ,राजांची ऋषींची नावे दिली . मिथुन ताररकासमूहातील प्रमुख दोन ताऱ्यांना  ग्रीक पुराणकतेथील कॅस्टर आणि पोलक्स यांचे नाव दिले गेले
सप्तर्षीतील ७ ताऱ्यांना भारतीयांनी   ७ विद्वान  ऋषींची नावे दिली . सिंह राशीतील तेजस्वी ताऱ्याला चिनी लोकांनी आपल्या पिवळ्या सम्राटच नाव दिल .व्याधाच्या  ताऱ्याला  ईजिप्शियन  लोक बालसुर्यदेव म्हणून ओळखत. देवांची,राजांची नावे द्यायची असल्याने  फक्त तेजस्वी ताऱ्यांचे नामकरण होत असे . 
पुढे अरबांनी दिसेल त्या ताऱ्याला नाव द्यायला सुरवात केली. अलनाथ,अल डेबेरान, देनेबोला हि सगळी अरबी नावे
अरबांनी तारकासमूहातील काल्पनिक आकाराच्या अवयवांवरून ताऱ्यांना नावे दिली . उदाहरणार्थ  देनेब म्हणजे अरबीत शेपटी .त्यामुळे सिंहाच्या शेपटीचा तारा म्हणजे देनेबोला तसेच हंसाच्या शेपटीचा तारा म्हणजे डेनेब.

पण या सगळ्या नावात एकवाक्यता नव्हती .तसेच  जसजसा ताऱ्यांचा अभ्यास वाढू लागला तसं तसं प्रत्येक  ताऱ्याचा  नाव देणं आणि सगळी नाव लक्षात ठेवणं भलतंच अवघड होत गेले.१७ व्या शतकात यात पहिली सुधारणा केली योहान बायरया जर्मन खगोलतज्ञाने.
 
जेव्हा गाव लहान असत तेव्हा प्रत्येक माणसाला सगळे नावानिशी ओळखतात पण गावाची लोकसंख्या वाढू लागते तेव्हा घराण्यावरून  माणूस लक्षात ठेवणं सोप्प जातं
पाटलाचा थोरला , देशमुखांची मधली, जोश्यांचा धाकटा अशी नावे ठेवली जातात .योहान बायर यांनी ताऱ्यांच्या बाबतीत पण हेच केलं.
प्रत्येक ताऱ्याला वेगळं नाव देण्यापेक्षा तो तारा ज्या तारकासमूहात असेल त्याच नाव  घ्यायचा आणि त्याची षष्ठी विभक्ती करायची आणि ताऱ्याच्या तेजस्विते प्रमाणे ग्रीक मुळाक्षरे - α,β,γ, δ वैगरे वापरायची. सगळ्यात तेजस्वी ताऱ्याला α म्हणायचं.

उदाहरणार्थ :मृग तारकासमूह म्हणजे ओरायन .याची षष्ठी विभक्ती होईल ओरायनिस. मृगातले सगळे तारे ओरायनिस या नावाने ओळखले जातील  काक्षी हा मृगामधील सगळ्यात तेजस्वी तारा अल्फा ओरायनिस  नावाने ओळखला जातो.त्याच्या पेक्षा थोडा कमी तेजस्वी राजन्य बीटा-ओरायनिस,Bellatrix  गॅमा-ओरायनिस असे नाव पडतील .


पण काही तारकासमूहातील तारे साधारण सारखेच तेजस्वी दिसतात. उदाहरणार्थ- सप्तर्षी.
अश्या वेळी  त्या तारकासमूहाचा काल्पनिक आकार लक्षात घेऊन त्याच्या डोक्या पासून सुरवात करत शेपटीपर्यंत ताऱ्यांना क्रम दिला जातो .सप्तर्षी तारकासमूहाचा काल्पनिक आकार अस्वल आहे . अस्वलाच्या डोक्याकडे येणारा क्रतु(डुबे) हा तारा अल्फा  उरसा मायनॉरीस होईल त्याच्या पुढचापुलह( मेराक) हा बीटा असं शेपटा पर्यंत जात शेपटीवरचा मरीची हा ईटा उरसा मायनॉरीस असेल


पण ग्रीक वर्णमालेत २४ मुळाक्षर आहेत. एखाद्या तारकासमूहात २४ पॆक्षा जास्त तारे असतील तर?
त्यासाठी बायर यांनी लॅटिन अक्षरे वापरयाला सुरवात केली मोठा A,b,c...z पर्यंत(i आणि j वगळून) अशी २४  नावे देता आली . बायर यांनी अश्या १५६४ ताऱ्यांचे नामकरण केले .
बायर यांनी उत्तर गोलार्धातून दिसणाऱ्या ताऱ्यांना नावे  दिली होती .पुढे दक्षिणी गोलार्धातील ताऱ्यांसाठी पण हीच पद्धत वापरली गेली . डोळ्यांनी दिसू शकणाऱ्या ताऱ्यांसाठी हीच पद्धत जगमान्य आहे .


बायर यांनी सध्या डोळ्याने निरीक्षण केले त्यामुळे त्यांना त्याकाळी एक दिसणारे काही तारे प्रत्यक्षात द्वैती  तारे  आहेत .अश्या वेळी  लॅटिन मधली मोठी A ,B,C,D... हि अक्षरे वापरली जातात
उदाहरणार्थ : नरतुरंगातील तेजस्वी तारा  अल्फा सेन्टोरी  मधले २ तारे Alpha Centauri A आणि Alpha Centauri B या नावाने ओळखले जातात

बायर पद्धतीत तारकासमूहातील सगळ्यात तेजस्वी ताऱ्याला अल्फा नाव दिल असलं तरी ८८ पैकी ३० हुन अधिक तारकासमूहातील अल्फा तारा हा त्या तारकासमूहातील सगळ्यात तेजस्वी तारा नाही !
याच कारण म्हणजे एकतर काही तारे त्या काळी बायर याना तेजस्वी वाटले असतील  पण आता त्यांच्या तेजस्वितेत फरक पडला असू  शकतो . किंवा काही तारकासमूहात बायर यांनी साधारण सारखी तेजस्विता असणाऱ्या ताऱ्यांमध्ये  पहिले उगवणारा अल्फा मानला . मिथुन तारकासमूहात  पोलक्स  प्लक्ष  हा तेजस्वी तारा आहे पण त्या ताकासमूहाच्या ग्रीक दंतकथेत कॅस्टर हा मोठा भाऊ असल्याने कॅस्टर हा तारा अल्फा  मानला गेला .नौका या मोठ्या तारकासमूहाचे विभाजन करताना तेजस्वी  तारा एका भागात गेल्याने उरलेल्या दोन तारकासमूहात अल्फा ताराच उरला नाही .


१७ व्या शतकात बायर यांनी मांडलेली हि नामकरण पद्धत आपल्याला आजही  उपयोगी आहे

अवांतर : आपण जसे ताऱ्यांना नाव देतो तसे तारे पण आपल्याला नाव ठेवत असतील का यावर मार्क्स पॅरिस यांचे हे व्यंगचित्र (सौजन्य :  off the mark.com)