रात्रीच्या आकाशात अगदी सहज जरी पाहिलं तरी दिसतात असंख्य तारे ! यांच्याच जोडीला आपल्या दिसतात भटके ग्रह, कापूस पिंजून ठेवल्या सारखे तेजोमेघ, द्राक्षाच्या झुबक्या प्रमाणे काही तारकापुंज .
मधेच एखादी चुकार उल्का चमकून जाते तर कधी धूमकेतू सारखे पाहुणे आपल्या भेटीला येतात .
चांदोबाला मामा म्हणणाऱ्या लहान मुलांपासून तर सहस्रचंद्रदर्शन करणाऱ्या आजोबांपर्यंत सगळ्यांनाच या आकाशाच कुतूहल असते.
आज सिमेंटच्या जंगलात खिडकीतून आकाशाचा अगदी छोटासा तुकडा आपल्या वाट्याला येतो .त्यात प्रकाशाचे बेसुमार प्रदूषण . या झगमगाटात चंद्राची कोर सुद्धा मोठ्या मुश्कीलने दिसते तर तारकासमूहांचे आकार , आपल्या आकाशगंगेचा पट्टा ,वसिष्ठ-अरुंधती सारखे जोडतारे ,मृगाचा तेजोमेघ ,कृत्तिके सारखे तारकापुंज हे सगळं दिसणं तर दुर्लभच झालंय.
तरी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या मनात एक आकाश असतं ! लहानपणी मामाच्या गावी अंगणात झोप लागेपर्यंत डोळ्यात साठवलेलं आकाश आजही मनात घर करून असतं .आजी आजोबानी सांगितलेली ध्रुवबाळाची, नक्षत्रांच्या गोष्टी ,मामाने दाखवलेला ध्रुवतारा , त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालणारे सप्तर्षी ,अंधुकशी अरुंधती ,डमरू सारखं मृग,त्यात हरीण बसवण्यासाठी कल्पनाशक्तीला दिलेला ताण .जुन्या लोकांनी सांगितलेल्या धूमकेतूच्या आठवणी ......हे सगळं आजही आठवणींच्या कुठल्याश्या कोपऱ्यात दडून बसले असते.
खरतर आपली संस्कृती सुद्धा या खगोलशास्त्राचा हात धरून जाते .बाळाचा जन्म झाल्यावर त्याच नाव त्याच्या जन्मनक्षत्रावरून ठेवतो . वास्तुशांतीच्या पूजेत ध्रुवताऱ्याची त्याच्या अढळपणामुळे प्रतीकात्मक पूजा केली जाते . लग्न झाल्या वर वधूवरांना सप्तर्षी आणि ध्रुवतार्याचे दर्शन घ्यायला लावतात .नवऱ्याने वसिष्ठ दाखवायचा आणि बायकोने त्याच्या शेजारची अंधुकशी अरुंधती ओळखून दाखवायची.सगळे सणवार हे चंद्राच्या कलेवर आधारित. मकरसंक्रांती सारखा एखादा सण सूर्याचे राशीभ्रमण दाखवून देतो .त्यावरून आपल्याला कळते कि सूर्य दर महिन्याच्या १४ तारखेला राशी बदलतो .तुम्ही जर चतुर्थी करत असला तर कळेल कि कृष्ण पक्षात चंद्र रात्री उगवतो तर शुक्ल पक्षात दिवसा .त्यात पण मे महिन्यातल्या चतुर्थीला चंद्रोदय सगळ्यात उशिरा .पोटात भुकेने ओरडणाऱ्या कावळ्यांमुळे हि गोष्ट आजही लक्षात आहे .रोजच्या पूजेत संकल्प सोडताना पंचांगाचा उल्लेख करावा लागतो . त्यातूनच रोजची तिथी,चंद्र,सूर्य ,गुरु हे कुठल्या राशीत आहे ?चंद्राची कुठली कला चालू आहे? हे रोजच्यारोज कळतं.कोजागिरी पौर्णिमे सारखा सण टिपूर चांदण्यात फक्त जागायला नाही तर जगायला शिकवतो .
आणि म्हणूनच शहराच्या झगमगाटात आपण आकाशदर्शन विसरतोय कि काय असं वाटत असताना सुद्धा कधी ट्रेकिंगच्या निमित्ताने ,तर कधी शहर पासून दूर प्रवास करताना अवचित निरभ्र नितळ आकाश दिसलं कि आपण थोड थांबतो.. तारकासमूहांचे आकार ओळखीचे वाटू लागतात.आठवणींचे पेटारे पुन्हा उघडली जातात . गोष्टी सांगणाऱ्या आज्जीचा आवाज कानात घुमायला लागतो.
"तो मृग कारे ?? .......हा सिंह असावा ... माझ्या मते हा तारा लुकलुकत नाहीये म्हणजे तो ग्रह असावा..
गुरु का तो? ..... हे इथे सप्तर्षी म्हणजे ध्रुव तारा हा असा इथे असणार ....
माझ्या मामानी लहानपणी शिकवलं होत मला .... तुला ध्रुवबाळाची गोष्ट माहितीये का ? माझी आजी सांगायची मला ..माझी फेव्हरेट गोष्ट होती ती !!!!!"
हे असले संवाद सुरु होतात. लहानपणी डोळ्यात साठवलेलं आकाश पुन्हा मनाला व्यापून टाकतं ..
आणि आकाशाशी पुन्हा नाते जडते ...
माझ्याही मनात असच आकाश दडले होते ..खगोलमंडळात यायला लागल्या पासून हे आकाश विस्तारायला लागले .तारे ,त्यांचा शास्त्रीय अभ्यास ,त्यांचे प्रकार यांचा अभ्यास सुरु झाला .वेगवेगळे तारका समूह ओळखता येऊ लागले लहानपणापासूनच गोष्टीवेल्हाळ असल्यानाने या प्रत्येक तारकासमूहाच्या वेगवगळ्या संस्कृतीत असणाऱ्या गोष्टी ,दंतकथा यात रमायला लागलो . त्याच सोबत त्यांची शास्त्रीय माहिती , अवकाशस्थ वस्तू यांचा अभ्यास सुरु झाला . रात्रभर जागून केलेली निरीक्षणे ,सध्या डोळ्याला न दिसणाऱ्या वस्तू दुर्बिणीतून पाहताना येणार आनंद . एक तास झुंझ देऊन दुर्बिणीतून स्वतः शोधात लावलेला एखादा ऑब्जेक्ट .यातून आकाश अधिकच समजत गेले .
या सगळ्या अनुभवाच्या शिदोरीतून एक एक घास काढून हा ब्लॉग लिहिण्याचा प्रयत्न ..
हे वाचताना तुमच्या मनाच्या कोपऱ्यात दडलेलं आकाश सुद्धा पुन्हा मुक्त व्हावं आणि आकाशही पुन्हा नातं जडावं हीच सदिच्छा !!!!!

Wa khoop chaan!!!!
ReplyDeleteWa khoop chaan!!!!
ReplyDelete
ReplyDeletehttps://goo.gl/Tk6e7S ओळख विश्वाची - सूर्यमाला, सूर्यमालेतील सर्व ग्रह, तारे आणि इतर काही गोष्टींची माहिती मराठी मध्ये आहे. सर्व वयोगटातील मराठी व्यक्तींना विचारात घेऊन ओळख विश्वाची हे अप्लिकेशन बनवण्यात आले आहे.