राशीचक्र म्हटलं कि आपल्याला शरद उपाध्ये आठवतात आणि मग अमक्या राशीचा माणूस रागीट तमका शंकेखोर किंवा रोज पेपर मध्ये येणार राशी भविष्य हे सगळं डोळ्या समोर येत .
खगोलशास्त्रीय दृष्ट्या राशी म्हणजे काय आणि त्याचे काय महत्व होते ते पण पाहणार आहोत.
उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या टप्यांवर माणसाने आकाशातील ताऱ्यांचे काल्पनिक समूह करून त्यांना काही तरी नावे दिली ज्यांना तारकासमूह म्हटले जाते .हळूहळू माणसाच्या हे लक्षात आले कि या सगळ्या तारकासमूहांमध्ये काही थोडे तारकासमूह आहेत कि त्याच्यातून सूर्य आणि चंद्राचे भ्रमण होते म्हणजे थोडक्यात काही तारकासमूह हे सूर्याच्या भ्रमण मार्गात आहे .
पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे वैज्ञानिक सत्य आपल्याला अगदी लहानपणापासून माहित आहे . पण पृथ्वी वरून निरीक्षण करताना आपल्याला असे भासते कि सूर्य पृथ्वीची प्रदक्षिणा करतो आहे .सूर्याचा हा भासमान मार्ग म्हणजे पृथ्वी भोवती एक मोठे वर्तुळ आपण मानू शकतो .
सूर्याचा हा भासमान मार्ग म्हणजे आयनिक वृत्त( Ecliptic) होय अर्थातच हे एक काल्पनिक वर्तुळ आहे.
चंद्र हा सुद्धा सूर्याच्या या मार्ग जवळूनच भ्रमण करतो .इतकेच काय बाकीच्या ग्रहांचे भ्रमण मार्ग सुद्धा आयनिक वृत्त जवळच आहेत . थोडक्यात हि सगळी मंडळी शाळेत जाणाऱ्या गुणी मुलांसारखी आयनिक वृत्तावरून एका रांगेत जातात . ८८ तारकासमूहांपैकी १२ तारकासमूह या आयनिकवृत्ताच्या पार्श्वभूमीवर दिसतात .त्यामुळे सूर्य किंवा चंद्र आणि इतर ग्रह नेहमी या १२ पैकी कुठल्या तरी एका तारकासमूहातच असतात
या १२ तारकासमूहांना राशी असे म्हटले गेले.ह्या राशी म्हणजेच मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन हे तारकासमूह.
राशी हि कल्पना भारतीय नाही .अगदी रामायण-महाभारतात सुद्धा राशींचे उल्लेख नाही . इसपु पाचव्या सहाव्या शतकात भारतीयाना राशी कल्पनेशी परिचय झाला असावा.राशी हि कल्पना मुळात सुमेरियन किंवा बॅबिलोनियन लोकांनी प्रचारात आणली असावीत.चीनमध्ये उंदीर, बैल, वाघ, ससा, ड्रॅगन, साप, घोडा, मेंढा, वानर, कोंबडा, कुत्रा व अस्वल अशी राशींची नावे होती. आज प्रचलित असणारी मेषादि नावे हिपार्कस यांच्या काळात (इ. स. पू. सु. १३०) रूढ झाली.हिपार्कस यांना अकराच राशी माहीत होत्या असे दिसते .पुढे वृश्चिकेतील काही भाग वेगळा करून तूळ हि एकमेव निर्जीव चिन्ह असलेली रास बनविण्यात आली असावी .
थोडक्यात राशी म्हणजे फार काही वेगळे नसून ८८ पैकी १२ तारकासमूहांना दिलेला दर्जा आहे . जसं मंत्र्यांना गाडीवर लाल दिवा लावून मिरवत येत तसं.आकाशात इतके सगळे तारकासमूह असताना फक्त या १२ तारकासमूहांनाच इतके महत्व का? याचे ऊत्तर म्हणजे या राशींचा उपयोग करून कालगना करता आली .
वेगवेगळे सणवार साजरे करण्यासाठी, पिकचक्रासाठी शेतसारा इत्यादी भरण्या साठी माणसाला महिना ,वर्ष यांच्या सारखी कालपमापनाची एकक आवश्यक होती . सूर्य आणि चंद्र यांच्या राशी भ्रमणावरून कालमापन करणे सोप्पे जाऊ लागले . सूर्य चंद्राच्या राशीन मधील प्रवेशावरून काही अंदाज बांधता येऊ लागले. उदाहरणार्थ आपल्या कडे सूर्याने मृग नक्षत्रात प्रवेश केला कि पावसाळा सुरु होतो त्याला अनुसरून शेतकरी शेतीची कामे करीत असत.
या १२ राशींनी आयनिकवृत्ताचा सारखा भाग व्यापलेला नाही . उदाहरणार्थ कन्या हे आकाराने मोठे तारकासमूह आहे तर कर्क हे लहान.त्यामुळे सूर्य हा कर्क तारकासमुहाजवळ थोडा वेळ दिसेल तर कन्या तारकासमुहाजवळ त्याचे भ्रमण दीर्घ काळ चालेल .एका वर्षात सूर्य १२ राशींचे भ्रमण करतो त्यामुळे कालमापन करण्यासाठी आयनिक वृत्ताचे १२ समान भाग करण्यात आले . ३६०➗१२ = ३० म्हणून आयनिक वृत्ताच्या ३०° च्या भागाला एक रास मानले गेले (भलेही प्रत्यक्षात त्या भागात त्या तारकासमूहाचा किती का हिस्सा असेना ) या मुळे सूर्य एक महिन्यात एका राशीत असतो आणि त्याने १२ राशी ओलांडल्या कि एक वर्ष होते असे कालमापन करणे सोप्पे जाऊ लागले .सूर्य कोणत्या राशीत आहे हे समजले कि आयनिक वृत्तावर तो नेमका कुठे आहे याचा अंदाज करता येतो . त्यावरून ऋतू , पाऊसपाणी, सणवार इत्यादींचे अंदाज करता येऊ लागले .
आयनिकवृत्त हे एक वर्तुळ असून राशी म्हणजे ३० चा एक भाग हे आपल्याला समजले .पण आता या राशिचक्राची सुरवात करायची कुठून ? एखाद्या वर्तुळाचे आपल्याला समान १२ भाग करायचे असतील तर वर्तुळावरील एखादा बिंदू आरंभ बिंदू म्हणून घ्यावा लागेल त्याच्या पासून ३०° वर दुसरा बिंदू काढावा लागेल.त्याच्या पासून पुढचा बिंदू ३०° वर असेल.असे १२ भाग आपल्याला काढता येतील .
आयनिकवृत्तावर वसंतसंपातबिंदू हा आरंभ बिंदू मानला गेला . ज्या काळात राशी संकल्पना पुढे येत होती त्या काळात म्हणजे इसवी सनाच्या पहिली शतकात वसंतसंपात बिंदूच्या पार्श्वभूमीवर मेष तारकासमूह होते . त्यामुळे मेष हि पाहिलं रास ठरली . वसंतसंपात बिंदू पासून पुढचे ३०° इतकी तिची व्याप्ती (प्रत्यक्षात मेष तारकासमूह त्याच्या आधीच संपते )त्याच्या पुढचे ३०° म्हणजे वृषभ रास आणि याप्रमाणे पुढे राशीचक्र तयार होत.
पृथ्वीच्या परांचांगती मुळे वसंतसंपात बिंदू दरवर्षी ५० कोनीय सेकंदाने मागे जातो.सध्या तो मिन राशीमध्ये आहे सायन राशी आणि निरयन राशी या वादाचे कारण हेच आहे .या वादात न पडता आकाशनिरीक्षणासाठी आपल्याला निरयन राशी उपयुक्त आहे.
सूर्य चंद्राच्या राशिप्रवेशावरून आपल्याला कोणते तारकासमूह दिसतील याचा अंदाज बांधता येतो.
उदाहरणार्थ सूर्य १४ एप्रिलला मेषराशी मध्ये प्रवेश करतो त्. १४ एप्रिल नंतर मेष रास सकाळी सूर्य सोबत उगवेल आणि संध्याकाळी सूर्यासोबत मावळेल.यामुळे जर मेष रास बघायची असेल तर ती १४ एप्रिलच्या आधीच पाहावी लागेल . परंतु मेष रास मावळात असताना पूर्वेला कन्या उगवत असेल आणि ती रात्र भर आकाशात दिसेल. त्यामुळे कन्या रास बघायचा सर्वतोत्तम कालावधी हा एप्रिलच्या मध्यानंतर असेल. पौर्णिमेला चंद्र ज्या राशीत असेल ती रास चंद्र प्रकाशामुळे दिसणार नाही .
तुम्हाला ग्रह शोधायचे असतील तर आकाशात इकडे तिकडे शोधाशोध करायची गरज नाही .ग्रह हे नेहमी कुठल्यातरी राशीतच सापडतील . उदाहरणार्थ गुरु हा कधी सप्तर्षीत किंवा मंगळ कधी नरतुरंग तारकासमूहात दिसणार नाही. त्यामुळे राशी हि संकल्पना समजली तर आकाशनिरीक्षण करणे सोप्पे जाते .
पुढच्यावेळी जेव्हा राशी हा शब्द तुमच्या नजरे समोर येईल तेव्हा भविष्य ,स्वभाव,प्रीती-षडाष्टक असलं काही न आठवता विशाल आयनिक वृत्ताचे १२ भाग आणि त्याच्या पार्श्वभूमीवरचे १२ तारकासमूह तुम्हाला आठवावेत हीच सदिच्छा !!!!!

खुपच छान
ReplyDeleteविनयजी जय हो, उत्तम रित्या उलगडून सांगितलयं खगोलीय विश्व.
ReplyDelete